काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू
नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी : नागरिकांना सोईस्कर होईल याकरिता काळेवाडीत कोविड-१९ लसीकरण केंद्र आवश्यक होते. यासाठी नगरसेविका निता पाडाळे यांचा महापालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महापालिकेच्या वतीने काळेवाडी गावठाण येथे महापालिकेच्या शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले आहे.
काळेवाडीतील या लसीकरण केद्रांत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड-१९ लसीकरण करावे. जेणेकरून कोरोना या महामारीपासून आपले संरक्षण होईल. असे आवाहन नगरसेविका निता पाडाळे यांनी केले आहे.
याबाबत नगरसेविका पाडाळे म्हणाल्या, काळेवाडीतील अनेक वयोवृद्ध नागरिक व महिला यांना इतर ठिकाणी लसीकरणासाठी जाण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी महापालिका आयुक्त व आरोग्य विभाग यांच्याकडे बऱ्यादा पत्रव्यवहार केला, तसेच 'ब' प...