Tag: Devidas Tambe

आप्पा तांबे यांचा प्रभाग ३३ मध्ये बैठकांचा धडाका
राजकारण

आप्पा तांबे यांचा प्रभाग ३३ मध्ये बैठकांचा धडाका

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूकीची तारीख कधीही जाहिर होऊ शकते. त्याच अनुषंगाने भाजपचे युवा नेते देविदास आप्पा तांबे यांचा बैठकांचा धडाका सुरू आहे. आप्पा तांबे प्रभाग क्रमांक ३३ मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत. रहाटणीतील प्रभाग क्रमांक ३३ हा बैठी घरे तसेच उच्चभ्रू सोसायटी अशा संमिश्र परिसरात पसरला आहे. या परिसरातील नागरिकांशी आप्पा तांबे यांनी थेट संपर्क सुरू केला असून विविध हाऊसिंग सोसायटी, कॉलनी व महिला बचत गटांच्या बैठकांवर तांबे यांनी जोर लावला आहे. या बैठकीत नागरिक तांबे यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत. यावेळी तांबे यांच्या वतीने महिला व तरूणांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या...