Tag: Dipak Khairnar

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पिंपरी चिंचवड

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी पिंपरी: निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हे एका महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.सदर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंतच्या रस्त्याचे एका महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यातच या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.खडीवर पु...