Tag: Dr Shrimant Kokate

शिवजयंतीचा वाद का?
विशेष लेख

शिवजयंतीचा वाद का?

डॉ. श्रीमंत कोकाटे आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा वाद नाही, मग शिवजयंतीचाच वाद का? शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आज देखील इतका आहे की त्यांच्या कार्याला पदोपदी विरोध करणाऱ्यांना शिवजयंतीचा वाद घालून त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा खोडसाळपणा करावा लागतोय. शिवाजीराजांच्या कार्याचा प्रभाव जगभर जाऊ नये, त्यांचे कृषी धोरण, युद्ध धोरण, प्रशासन धोरण, आरमार, महिला विषयक धोरण, स्थापत्यशास्त्र, धार्मिक धोरण, गुप्तचर यंत्रणा, समतावादी तोरण, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी विषयावर चर्चा होऊ नये. जयंतीचा वाद निर्माण करून सनातनी व्यवस्थेने छत्रपती शिवाजीराजे यांची अवहेलना सुरू ठेवलेली आहे. त्यांच्या जागतिक प्रभावाला पायबंद घालण्यासाठी शिवजयंतीचा वाद निर्माण केला जातो. कोणत्याही व्यक्तीचा जन्म एकदाच होतो. तो तीन-तीन होत नाही. तीन वेळा शिवजयंत...
कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार
विशेष लेख

कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार

डॉ श्रीमंत कोकाटे 'रेनिसां 'ही व्यापक संकल्पना आहे. पंधराव्या शतकात रोमन साम्राज्यात रेनिसां झाला. त्यामुळे कला, शिल्पकला, साहित्य, विज्ञान, संगीत, चित्रकला यांचा विकास झाला. धार्मिक गुलामगिरीला आव्हान दिल्यामुळे अनिष्ट रूढी, परंपरा याविरुद्ध लढा उभारला गेला. ग्रंथप्रामाण्य नाकारून बुद्धिप्रामाण्यवादाला चालना मिळाली. धर्मगुरूंच्या आणि धर्मग्रंथांच्या जाचातून मुक्त होऊन युरोपमध्ये नवविचारांचा उदय झाला. त्यातूनच युरोपमध्ये औद्योगिक आणि आर्थिक क्रांती झाली. हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जखडलेल्या जनतेला प्रबोधन चळवळीमुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. रेनिसांमुळे त्यांना नवनिर्मितीची संधी मिळाली. वैचारिक क्रांती झाली. त्यातून कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञानाचा उदय आणि विकास झाला. धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून पोसलेल्या कर्मठ, सनातनी परंपरेला शह दिल्यामुळे युरोपमध्ये रेनिसां झाला. 'रे...