Tag: Imran Shaikh

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती 
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती

पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार - इम्रान शेख कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार पिंपरी, ता. २९ जुलै (लोकमराठी न्यूज) : " शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणुन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोलजी कोल्हे, आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या ...