विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर
दासूृ भगत
आशिया खंडातील सर्वात मोठी झाेपडपट्टी धारावी ही काही अभिमानाने सांगायची मुळीच गोष्ट नाही पण धारावीचा उल्लेख असाच होतो. धारावी माटूंगा लेबर कॅम्प वस्तीत या पोराचा जन्म झाला. येथील मुलांना बालपण नावाची अवस्था असते का? तिन बहिणी आणि दोन भावाच्या कुटूंबात हा सर्वात मोठा. जॉन राव हे याचं नाव. खूप पूर्वीच आई वडील आंध्र प्रदेश सोडून मुंबईत आले होते. वडील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत मशीन ऑपरेटर होते. जॉन १० वर्षांचा असताना कुटूंब किंग्ज सर्कल परीसरातील झोपडपट्टीत स्थायिक झाले. निसर्ग पावसाळ्यात अशा वस्तीवर जरा अधिकच उदार होतो. झोपडीतून जेथून जमेल तेथून तो कुटूंबाना कडकडून भेटत राहतो. जॉन पण आपल्या भावा बहिणी सोबत खाटेवर किडूक मिडूक सांभाळत बसून राही. आई वडील घरात साचलेले गुडघाभर पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. छपरातून पण गळती सुरू होई मग जॉन एखादे भांडे घेऊन त...