काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या दहावी व बारावी उत्तीर्ण नातवांचा गौरव सभारंभ उत्साहात
पिपरी : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाच्या सभासदांच्या १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सभारंभ संघाच्या विरंगुळा केंद्र सभागृहात आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. प्रा. हभप हेमलता सोळवंडे होत्या. त्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक, रोख बक्षीस, भेट वस्तू व मिठाई देवुन ३० विद्यार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
यावेळी योग गुरू बाबा सुरेश विटकर यांचा सत्कार संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर डॉ. प्रा. हेमलता सोळवंडे यांचा सत्कार संघाच्या महिला उपाध्यक्ष सुरेखा नखाते यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे हे होते.
या प्रसंगी संघाचे सल्लागार पोपटराव माने व शालन माने यांचा वाढदिवसा निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळ...