तरसाशी सामना करणाऱ्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा सन्मान
व्हिडीओ पहा :https://youtube.com/shorts/kifIPA9dkdU?feature=share
पुणे : खेडच्या खरपुडीत तरसाने एका बाबांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. तरुणाई तरसाला पाहून धूम ठोकताना, व्हिडीओ काढताना दिसतेय, पण अशा अचानक झालेल्या हल्ल्यात जाधव बाबांचे प्राण वाचवण्यासाठी, प्रसंगावधान राखत पंडीत गाडे बाबांच्याच हातची काठी घेऊन जिवाची पर्वा न करता त्या तरसावर तुटून पडले. आणि जाधव बाबांना हिंस्त्र तरसाच्या तावडीतून सोडले. सारे खरपुडीकर सांगतात, तिथे पंडीत गाडे नसते तर कदाचित आज जाधव बाबांच्या जिवावर बेतले असते.
अशा धाडशी व्यक्तिमत्वाचे अभिनंदन व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, उमलत्या पिढीने, तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यावा. या भावनेतून खेड तालुका शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष धर्मराज पवळे यांनी खरपुडीत जाऊन त्यांचा सन्मान केला.
यावर पंडीत गाडे म्हणाले, "रस्त्यावर अपघात...