Tag: Kudalwadi

महावितरणचा कारभार सुधारण्याची चिखली-कुदळवाडीतील नागरिकांची मागणी
पिंपरी चिंचवड

महावितरणचा कारभार सुधारण्याची चिखली-कुदळवाडीतील नागरिकांची मागणी

पिंपरी चिंचवड : महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे चिखली-कुदळवाडीतील नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा दोषमुक्त आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महावितरणला नव्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चिखली प्राधिकरण, राजे शिवाजीनगर (पेठ क्र. १६) जाधववाडी, पंतनगर, कुदळवादी परिसरात तर मंगळवारी (दि.१९) रात्री दहा वाजता बत्तीगुल झाल्यामुळे हजारो नागरिक घामाघूम झाले होते. अनेक सोसायट्यामधील पाणी उपसा सलग पाच तास वीज पुरवठा नसल्यामुळे बंद पडला होता. असे नागरिकांनी सांगितले. औद्योगिक वापरासाठी असलेल्या उच्चदाब वाहिनीवरून येथील घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मोशी येथील महावितरण कार्यालयाचा देखभाल आणि तांत्रिक विभागाचे येथील कामकाजामध्ये बिले वसूल करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. असाही आरोप नागरिकांनी केला आहे.&...