Tag: Lata Mangeshkar

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये माता रमाबाई आंबेडकर व लता मंगेशकर यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये माता रमाबाई आंबेडकर व लता मंगेशकर यांना अभिवादन

रहाटणी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर जयंती व लता मंगेशकर यांना श्रद्धांजली सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली. रमाबाई यांच्या व लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुरुषोत्तम गाणार, बाळासाहेब शेंडगे, संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते. “करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासूर्याची सावली, कोटयावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जायनी, रामू, रमा, रमाई रंजल्या-गांजल्यांची दीन-दलितांची आई मातारमाई ह्यांनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न धरता त्या अशिक्षित मातेने बाबासाहेबांच्या क...

Actions

Selected media actions