PIMPRI : गाथा सन्मानाची : कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा
पिंपरी, दि. 9 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या वतीने "गाथा सन्मानाची" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
हा सन्मान सोहळा रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजता गोदावरी आंगण, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, विशेषतः परिचारिका, शिक्षिका, ब्युटीशियन, पोलीस कॉन्स्टेबल, तसेच इतर विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महि...