Tag: #lokmarathinews

मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई
पुणे

मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई

पुणे, दि. १८ (लोकमराठी) - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एसीबी) मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. यासह साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकाश महादु दुधवडे( वय -२३ वर्षे, रा.पोखरी, पवळदरा, ता. संगमनेर, जि.अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पुणे ग्रामीण मध्ये मागील वर्षभरात सायकल चोरींच्या प्रकरणात कमालीची वाढ दिसून आली. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार ९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मोटार सायकल चोरावर मोठी कारवाई करत दहा लाख रूपये किंमतीच्या एक...
वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..
पुणे

वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..

वडगांव मावळ, दि.१५ (लोकमराठी) - वडगाव शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन वडगाव मावळ भाजप महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाच्या वतीने वडगाव नगरपंचायत तसचे वडगाव पोलिस स्टेशन यांना दिले. वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन,तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार सर्रास होतं आहेत. तसेच अनेक ठिकाणे ही नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या सर्व लांछनास्पद गोष्टींना आळा बसावा यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चा ने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागण...
तेरच्या प्राचीन बौद्धस्तुपाची प्रतिकृती पिंपळदरी येथे  उभारणे हीच  दिवंगत पँथर यशपाल सरवदे यांना खरी आदरांजली ठरेल – केंद्रीयराज्यमंत्री  रामदास आठवले
ताज्या घडामोडी

तेरच्या प्राचीन बौद्धस्तुपाची प्रतिकृती पिंपळदरी येथे  उभारणे हीच  दिवंगत पँथर यशपाल सरवदे यांना खरी आदरांजली ठरेल – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. १२ (लोकमराठी) - उस्मानाबाद मधील तेरणा नदीच्या किनारी तेर गावात झालेल्या उत्खननात सापडलेल्या प्राचीन  स्तुपाचे जतन झाले नाही त्यामुळे या स्तुपाची प्रतिकृती गडपिंपळदरी येथे  उभारण्याचे दिवंगत यशपाल सरवदे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी ५ एकर जमीन घेऊन हॉल ही उभारला आहे. जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी या जागेला भेट देतात. त्यामुळे तेर च्या प्राचीन बौद्ध स्तुपाची प्रतिकृती गडपिंपळदरी ( जिल्हा उस्मानाबाद) येथे उभारणे हीच खरी दिवंगत पँथर यशपाल सरवदे यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.  उस्मानाबाद मधील  भारतीय दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत राहून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे खंदे  समर्थक नेते राहिलेले पँथर यशपाल सरवदे यांचे नुकतेच न...