Tag: marathi book

शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर
विशेष लेख

शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर

‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’ च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातील महत्त्वाचा संकलित अंश… 1) सांगलीमध्ये काही डॉक्टर, काही निरनिराळ्या क्षेत्रामधील मंडळी एकत्र येऊन आम्ही एक मासिक पत्रिका चालवतो. त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चांगलं काय आणि ते ‘सायंटिफिक’ कसंय. आपल्याला वैज्ञानिक वगैरे असं म्हटलं की कळणं अवघड होतं. पण ‘सायंटिफिक’ म्हटलं की, अभिजात मराठीत पटकन कळतं. तर ते ‘सायंटिफिक’ कसंय हे सांगण्याचा प्रयत्न एक सद्गृहस्थ करत होते लेखनातून. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की, कुंकू लावणं हे कसं ‘सायंटिफिक’ आहे. आपण सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. कुंकू लावलं की… भ्रूमध्यामध्ये अमूक एक बिंदू कसा असतो आणि वैज्ञानिक दृष्टीने तो दाबबिंदू कसा असतो. त्यामुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन वगैरे वगैरे कसं राहतं. माझं ड...
‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक
विशेष लेख

‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक

जगदीश काबरे हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'देवाची करणी आणि नारळात पाणी' या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो ...