Tag: Omicron variant

नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण

पिंपरी : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutation) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.‍ दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकुण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर ‍तिघे त्यांचे निकटसहवासित आहेत.नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ महिला तिच्या १२ आणि १८ वर...