KATRAJ : अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगावात दिंडी पंगत संपन्न
पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरच्या भक्ती यात्रेत पायी चालणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 97 च्या वैष्णव भक्तांसाठी कात्रज मधील अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगाव या गावी पंगत संपन्न झाली. कात्रज ग्रामस्थांच्या वतीने गेले 50 ते 60 वर्षांपासून या दिंडीसाठी पंगत सेवा रुजू करण्याची परंपरा आहे.
जुन्या जाणत्यांच्या मार्गदर्शनात आज कात्रज गावची चौथी पिढी ही सेवा रुजू करत आहे. भंडी शेगाव येथे संपन्न झालेल्या पंगतीच्या निमित्ताने, दिंडी क्रमांक 97 चे अध्यक्ष ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, उपाध्यक्ष योगेश कदम यांनी दिंडीच्या वतीने मंडळाचा अध्यक्ष या नात्याने प्रतिक कदम यांचा सत्कार केला. या मंडळाचे संस्थापक सुरेश कदम आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय सुरेश कदम, प्रभाकर बाबा कदम, किसन आण्णा जेधे, आप्पासाहेब गायकवा...