बलशाली भारत घडवण्याच्या राष्ट्रकार्यात योगदान द्या; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदवाटप समारंभ
पिंपरी, दि.२३ (लोकमराठी) - संघटनेत काम करताना ‘एकमेकां सहाय्य करू’ हे धोरण प्रत्येकाने अंगीकारताना आपले १०० टक्के योगदान देणे गरजेचे आहे. कार्यकारिणी आणि कार्यकर्ता हे आपल्या संघटनेची दोन चाके आहेत. या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आपले ‘उद्दिष्ट’ साध्य करता येवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत जगातील बलशाली राष्ट्र म्हणून विकसित होत आहे. या राष्ट्रकार्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारीणीचा पदवाटप कार्यक्रम मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात बुधवारी झाला. यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा शहर सरचिटणीस शीतल...