Tag: PMC

महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
पुणे

महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पुणे (लोकमराठी) : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी (ता. 20) घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार काम करण्याच्या सूचना त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल प्रिन्सिपल बॅच नवी दिल्ली, यांच्या आदेशान्वये मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय, जलप्रदूषण, जैव विविधता व जलविज्ञान या बाबींवर सनियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ, निरी संस्थेचे डॉ. रितेश विजय, जलसंपदा विभागाचे अधिकारी पी. के. शेलार, विभागीय आयुक्त कार्यालयाचे नगर प्रशासन वि...

Actions

Selected media actions