Tag: Pravin Darekar

दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर

पिंपरी, ता. १५ : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करीत त्यांचा आदर केला जातो. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेवून आम्ही महिला लोकनेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजकारण आणि राजकारणात काम करीत आहोत. या महाराष्ट्रात मनुवादी विचारांच्या भाजपने यापूर्वीही महिलांबाबत निंदाजनक वक्तव्य केले आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांचा पुन्हा अपमान केला आहे त्यांनी तमाम महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांनी सांगितले. https://youtu.be/3SdBOCfX9pY पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पिंपरीत महात्मा फुले पुतळ्यासमोर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा निषेध करीत त्यांच्य...