Tag: Rahatani

आधार कार्ड नोंदणी कॅम्पला रहाटणीकरांचा उदंड प्रतिसाद
पिंपरी चिंचवड, सामाजिक

आधार कार्ड नोंदणी कॅम्पला रहाटणीकरांचा उदंड प्रतिसाद

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देविदास तांबे यांनी केले होते आयोजन रहाटणी, ता. २० मे : चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा सांगवी काळवाडी मंडल अध्यक्ष देविदास अप्पा तांबे यांनी रहाटणीकरांसाठी नवीन आधार कार्ड व आधार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती दोन तीन दिवशीय कॅम्पचे नुकतेच आयोजन केले होते. या कॅम्पला राहटणींकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. विविध सरकारी व निमसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व बँकेच्या कामकाजात सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. तसेच आता शाळा, कॉलेज सुरु होत असल्याने आधार कार्ड आवश्यक आहे. दैनंदिन कामकाजातून नागरिकांना वेळ मिळत नाही तसेच कामगार व नोकरदार वर्गाला वेळ काढून महाईसेवा केंद्र अथवा पोस्टात जाने शक्य होत नाही, त्यामुळे नागरिकां...