Tag: Republic day

श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 
शैक्षणिक

श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर, दि. २६ : श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व कृषी ग्राम विकास प्रतिष्ठान घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसात वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. आजच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे किसनराव तात्या पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब पानसरे यांनी भूषविले. झेंड्याला सलामी देत फॅशन डिझाईनच्या मुली यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत स्वागत गीताची लयबद्ध गुंफण घातली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रस्ताविक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक...