Tag: Sad News

दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन

पिंपरी चिंचवड : उद्योजक सुरेश सखाराम शिंदे (वय ६१, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ८) दुपारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यानं नातेवाईक व मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे. काळेवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडगाव गुप्ता (ता. व जि. अहमदनगर) या मुळगावी रविवारी रात्री त्यांच्यावर मोठ्या दुख:मय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले दोन, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे व इंजिनिअर सचिन शिंदे यांचे ते वडील होत. ते कायमच पुरोगामी व स्पष्टवक्तेपणा विचाराचे पुरस्कर्ते होते. भोसरी एमआयडीसीतील कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत १९९२ साली त्यांनी आर. एस. इंडस्ट्रीज या कंपनीची ...