Tag: Sanjay Awate

“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे
पुणे, शैक्षणिक

“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे

हडपसर (प्रतिनिधी ) : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासनारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडत आहे. हा माणूस जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा असावा. सर्व धर्म समभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडायला पाहिजे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीर यांनी दाखवलेली वाट हीच प्रकाशाची वाट आहे. महापुरुषांना जाती धर्मात न बांधता आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करूया. जातीचा अंत झाला, तरच भारत देश महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर महापुरुषांचे विचार समजावून सांगितले तरच संस्कारित पिढी निर्माण होईल. ही पिढी भारत देशाला बलवान करेल. आपण सर्वजन कर्मवीरांचा समतेचा व मानवतेचा विचार समाजात रुजवूया. असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉले...