पाचवे दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न
बैंक ऑफ बडोदा प्रायोजक तत्वावर सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी केला संयुक्तरित्या संकल्प
पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 20 जुलै 2022 रोजी सप्तर्षी फाऊंडेशनच्या विभागीय कार्यालयात विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत चौथे होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.
या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंद...