Tag: Sex Education

निकोप समाजासाठी लैंगिक शिक्षणाची गरज
विशेष लेख

निकोप समाजासाठी लैंगिक शिक्षणाची गरज

जेट जगदीश खजुराहोच्या मंदिरांवर कामक्रीडेच्या मिथुन शिल्पांना सन्मानित केलेल्या आणि वात्सयानाने कामक्रिडेला निकोपतेच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलेल्या देशात लैंगिक व्यवहारांचे निकोप शिक्षण न दिल्यामुळे समाजात आज शृंगाराच्या नैसर्गिक प्रकृतीची सीमा विकृतीला जाऊन पोहोचली आहे. मुलं वयात आल्यानंतर त्यांच्याशी पालक लिंगसमभाव या विषयावर कधीही खुलेपणाने बोलत नाहीत की त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या बदलत्या शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहितीही देत नाहीत. एवढेच काय पण शाळेतही मानवी पुनरुत्पादनाची माहिती शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित समजून देण्याऐवजी शाळेतील शिक्षक/शिक्षिकाही मुलांना हा धडा तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला सहज समजेल, असे म्हणत हा विषय शिकवणे टाळत असतात. त्यामुळे मुले/मुली लैंगिकतेविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधू लागतात. ती नेहमीच योग्य पद्धतीने मिळतीलच असे नाही. उलट इंटरनेट...