Tag: Shri Shri Ravi Shankar

श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी, पुणे

श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता ८ जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपल्या फेसबुक पेजवरुन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी बदनामी केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने वाकड पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravi Shankar) यांच्या फेसबुक तथा युट्युब पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, अहमदनगरमधील एका खटल्याच्या निकालात न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महार...