Tag: Swaraj abhiyan

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकानांवर कायदेशीर कारवाई करा – सुराज्य अभियान
महाराष्ट्र, मोठी बातमी

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकानांवर कायदेशीर कारवाई करा – सुराज्य अभियान

मुंबई : ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयी ‘रेड-बबल’सारख्या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांद्वारे, तसेच दुकानांत आणि रस्त्यावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ‘मास्क’ची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही, या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. https://youtu.be/9oCLG_crkw4 रा...