काळेवाडीत महिला आरोग्याबाबत जनजागृती | सुजाता नखाते यांच्यातर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभात डॉ. खैरनार यांनी केले मार्गदर्शन

काळेवाडीत महिला आरोग्याबाबत जनजागृती | सुजाता नखाते यांच्यातर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभात डॉ. खैरनार यांनी केले मार्गदर्शन

काळेवाडी : महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी हरेश आबा नखाते मित्र परिवार व मुक्त सखी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. दिपाली खैरनार व डॉ. दीपिका खैरनार यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच जाणीव फाउंडेशनच्या सदस्या सुजाता नखाते यांच्या तर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिलांनी हळदी-कुंकू व जनजागृती कार्यक्रमचा लाभ घेतला.

यावेळी मीनाक्षी वराड, चंद्रिका साळुंके, गायत्री विटकर, दिपाली नढे, वंदना वायभट, वैशाली राऊत, अनिता पांचाळ, अलका खोमणे, सुमन कोकणे, तस्लिम शेख, संगीता पवार, उज्वला गव्हाणे, सविता जाधव, प्रतिभा ताम्हणकर, पुनम नढे, माधुरी जगदाळे, कोमल वायभट, कांचन गायकवाड, अनिता विटकर, कविता मंजाल, सौ भरणे, सौ जंगम यांच्यासह मातृछाया कॉलनी महिला मंडळ, समता कॉलनी मित्र मंडळ, सहकार कॉलनी मित्र मंडळ, चंद्रकिरण मित्र मंडळ, समता कॉलनी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.