यशस्वी विद्यालयात पहिली ते नववीचे ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू

यशस्वी विद्यालयात पहिली ते नववीचे ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू

पिंपरी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मंगळवारपासून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करून इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग ५ जानेवारी २०२२ पासून ऑनलाईन सुरु होते. म२त्र, मंगळवारपासून विद्यार्थींचे प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्यापन सुरु करण्यात आले. शाळा भरण्यापूर्वी संपूर्ण शाळेचा परिसर, वर्ग खोल्या स्वच्छ करून सॅनिटाईजरची फवारणी करण्यात आली. वर्ग खोल्यासमोर व शालेय परिसरामध्ये जागोजागी सॅनिटाईजर व हॅन्ड वॉशची सुविधा करण्यात आली.

विध्यार्थ्यांच्या स्वागतसाठी संपूर्ण शालेय परिसर रंगीत फुगे लावून, रांगोळी काढून सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी औक्षण करून केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते यांनी सर्व विध्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले. सुंदर अशी वर्गसजावट करून शिक्षकांनी अध्यापणास सुरुवात केली. सर्व विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील सर्व नियमाचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले व मोठ्या उत्साहामध्ये ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले.