कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल रॅली

कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल रॅली

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत मधील सर्व सामाजीक संघटनेच्या श्रमप्रेमीनी कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल रॅली काढून विविध ठिकाणी वृक्षारोपन केले, या रॅलीत ८१ लोक सहभागी झाले होते.

कर्जत शहरात माझी वसुंधरा 2 मध्ये सलग ४८६ दिवसापासून सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व श्रमप्रेमींनी दररोज श्रमदान करत नगर पंचायत कर्जतच्या सहकार्यने शहराला स्वच्छ सुंदर व हरित बनले आहे. या बरोबर अनेक जण सायकल वापरून पर्यावरणाचे संवर्धन ही करत आहेत, या अंतर्गत आज दि ३० जाने रोजी दुसरी कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारी (रॅली) काढण्यात आली, पहाटे पाच वाजता ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात दर्शन घेऊन या वारीस सुरुवात झाली.

कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल रॅली

कर्जत पासून निघाल्यानंतर या वारीचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले, या श्रमप्रेमींनी विविध गावात झाडे लावून त्यास ट्रीगार्ड ही बसवले, जेऊर येथे सरपंच साळवे, ऍड वैभवराज राऊत, टेम्भुर्णी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सर्वांचे स्वागत करून या अभियानाचे कौतुक केले तर करकम येथे नीळकंठ ढोबळे यांनी दुपारच्या रुचकर भोजनाची व विश्रांतीची व्यवस्था केली होती, करकम मधील नागरिकांनी सुरू केलेल्या लेकीची आठवण या अभियानात लावण्यात आलेल्या दीडशे झाडाच्या वृक्षरोपन अभियानाची माहिती घेऊन दोन झाडे लावण्यात आली.

पांढरेवाडी येथे अर्जुन घोडके महाराज यांची चहा पाण्याची व्यवस्था केली. तर पंढरपूर येथे ही दोन झाडे लावण्यात आली, दिवसभर सव्वाशे किलो मीटर सायकलवर प्रवास करत पंढरपूर पर्यत पर्यावरण जनजागृती सायकल रॅली चंद्रभागेत आंघोळ करून विसर्जित करण्यात आली यानंतर सर्वानी पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली परतत असताना पंढरपूर येथे डॉ योगेश रणदिवे यांनी भोजनाची व्यवस्था केली. कर्जत शहरात दररोज स्वच्छता व वृक्षारोपणावर काम करत श्रमदान करणाऱ्या या सर्वानी कर्जत शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना केली या सायकल वारीत शहरातल्या विविध थरातील नागरिक सहभागी झाले होते.