Chinchwad : पोदार शाळेत व्हर्च्युअल ई-लर्निग

Chinchwad : पोदार शाळेत व्हर्च्युअल ई-लर्निग

चिंचवड, (लोकमराठी) : कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हर्च्युअल ई-लर्निगच्या माध्यमातून मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम घेतला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. असे प्राचार्य शहनाज कोटार यांनी सांगितले.

शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते आतुट राहण्यासाठी हा अभ्यासक्रम घेतला जात असून विद्यार्थी शाळेचा सगळा अनुभव घेत आहेत. या उपक्रमास शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार यांचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षक विशेष शैलीने विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना आपले शिक्षक व वर्गमित्र यांच्यासोबत संवाद साधला जातो. त्यामुळे विदयार्थी खेळीमेळीने शिक्षणाचा आनंद घेत असल्याचे प्राचार्य कोटार यांनी सांगितले.