लेखक आत्माराम हारे यांना ‘उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार’ डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान

लेखक आत्माराम हारे यांना 'उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार' डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान

पुणे : काव्यार्चना काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा रविवारी (ता. १२ डिसेंबर) मोठ्या उत्साहात येथे पार पडला. त्यावेळी पिंपळे गुरव येथील कवी व लेखक आत्माराम गोविंदराव हारे यांना कालकथित लक्ष्मीबाई गुलाबराव सोमकुंवर यांच्या स्मरणार्थ “उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार २०२१” प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्याप्रसंगी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्राचार्य हनुमंत धालगडे, प्रा. व्यंकटराव वाघमोडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केले होते.