Tag: Dr Shripal Sabnis

लेखक आत्माराम हारे यांना ‘उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार’ डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान
पुणे

लेखक आत्माराम हारे यांना ‘उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार’ डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान

पुणे : काव्यार्चना काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा रविवारी (ता. १२ डिसेंबर) मोठ्या उत्साहात येथे पार पडला. त्यावेळी पिंपळे गुरव येथील कवी व लेखक आत्माराम गोविंदराव हारे यांना कालकथित लक्ष्मीबाई गुलाबराव सोमकुंवर यांच्या स्मरणार्थ "उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार २०२१" प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्राचार्य हनुमंत धालगडे, प्रा. व्यंकटराव वाघमोडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केले होते. ...
शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : "तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे", अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले. ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते. व्हिडिओ पहा https://fb.watch/7mihnlWzG-/ मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या...