यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस मध्ये अर्थसंकल्प मार्गदर्शन संपन्न

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस मध्ये अर्थसंकल्प मार्गदर्शन संपन्न

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) येथे केंद्रीय अर्थसंकल्पावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात अर्थसंकल्प पूर्व चर्चा करताना संस्थेचे प्रा. महेश महांकाळ यांनी विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाच्या संकल्पनेपासून मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.

तसेच वार्षिक वित्तीय विवरण, देयकांची शिल्लक, संतुलित अर्थसंकल्प, भांडवली खर्च, भांडवली प्राप्ती, कॉर्पोरेट कर, कस्टम ड्युटी, प्रत्यक्ष कर, डिस्पोजेबल इन्कम, एक्साईज ड्युटी यासारख्या अर्थसंकल्पातील विविध प्रमुख अर्थविषयक संज्ञा स्पष्ट केल्या.

तर प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशीही एमएस प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. यानंतर प्रा. महेश महांकाळ यांनी अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या ठळक बाबींचे काय काय परिणाम अर्थव्यवस्थेवर होतील याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

अर्थसंकल्प समजून घेऊन त्याचा सामान्य नागरिकांवर, उद्योग क्षेत्रावर, रोजगारावर कसा परिणाम होतो याबाबतही प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थी दशेतच अर्थसंकल्प समजून घेण्याचे कौशल्य माहीत झाल्यास, अर्थविषयक बातम्या व लेख वाचण्याची सवय लावून घेतल्यास त्याचा पुढे करिअरच्या वाटचालीत सकारात्मक फायदा होतो. असे मत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी यावेळी व्यक्त केले. या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेत एमबीए, एमसीएचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.