बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेजमधील मुले-मुली प्रथम

बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेजमधील मुले-मुली प्रथम

हडपसर (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा विभागीय क्रीडा स्पर्धेत, बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील मुली व मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेजमधील मुले-मुली प्रथम

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशात क्रीडा संचालक प्रा. दत्ता वसावे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय जडे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचा मोलाचा वाटा आहे.