- काळेवाडीत आरोग्य तपासणी शिबिराचा २३०० नागरिकांनी घेतला लाभ
काळेवाडी : आजच्या धकाधकीच्या काळात शरीरासह मानवी मनावर देखील मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळे निरोगी शरीरासाठी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे बनले आहे. असे मत डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केले.
काळेवाडीतील विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय माने यांच्या सहकार्यातून प्रभागातील नागरिकांसाठी नुकतेच भव्य आरोग्य व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे २३०० नागरिकांनी सहभाग घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तर सुमारे ७० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
प्रभागातील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अल्पदरात चष्मे वाटप, वजन कमी करण्याचे उपाय, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी यांचा लाभ घेतला. या कार्यक्रमास रेड प्लस ब्लड बँकेचे पी.के. शिंदे, नेत्र तज्ञ डॉ. संतोष रणवरे व त्यांचे सहकारी डॉ. समभा शेख, डॉ. दीपक मोरे, जनरल सर्जन डॉ. कुमार कन्सल्टंट NSV हे डॉक्टर तसेच संस्थेचे अध्यक्ष गंगाराम माने, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा माने व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुधाळ आदी उपस्थित होते.
कोरोना महामारी संकटकाळात सातत्याने नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणारे व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांनी पुन्हा एकदा काळेवाडी प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा गरजूंना मोठा फायदा झाला. तसेच शहरात प्रामुख्याने जाणवत असलेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचेही आयोजन केले.