
पुणे: (लोकमराठी) पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. मृतांची संख्या आता ३८ झाली आहे.
कोंढव्यातील ५० वर्षीय महिलेवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. तर पर्वती दर्शन येथील २७ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली होती. १२ एप्रिलला त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तो मद्याचे अतिसेवन करत होता. यात त्याचे यकृत निकामी झाले होते. त्याचाही आज मृत्यू झाला.
तसेच, घोरपडी येथील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला २ एप्रिलला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाब आणि किडनीचा आजार होता. कोंढव्यातील एका ४० वर्षीय महिलेला दम्याचा आजार होता. तिलाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना दमा आणि मधुमेह होता. त्यांचाही आज मृत्यू झाला. आज दिवसभरात काही तासांतच चौघांना करोनानं बळी गेला आहे. या चौघांसह पुण्यातील मृतांचा आकडा ३८वर पोहोचला आहे.
- HADAPSAR : राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात - डॉ. सदानंद भोसले
- Santosh Deshmukh : प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी
- HADAPSAR : एस. एम. जोशी महाविद्यालयात “एसएम टेक्नो वेंझा 2K25" स्पर्धेचे आयोजन
- Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन
- International Women's Days : वंचितांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम