पिंपरी : जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यांमध्ये कोणत्याही निवडणुका घेऊ देणार नाही. असा इशारा प्रा. गणेश आर ढाकणे यांनी येथे दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रा. ढाकणे बोलत होते.
या आंदोलनात अरुण पवार, आनंदा कुदळे, विशाल जाधव, कैलास सानप, अमोल नागरगोजे, विशाल वाळुंजकर, गणेश ढाकणे, गणेश वाळुंकर, सुरेश गायकवाड, संजय गायके, जितेंद्र बांगर, विजय सोनवणे, सचिन बांगर, बाळासाहेब लटपटे, दादासाहेब दहिफळे, मिलिंद ठाकर, विष्णू कुऱ्हाडे, सोमनाथ काशीद, रोहन सुरवसे, विलास गडदे, तुकाराम सुरवसे, बळीराम सर, सुनील जायभाय, चंदन केदार, उद्धव सानप, हनुमंत आर घुगे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
प्रा. ढाकणे म्हणाले की, जर आरक्षण मिळणार नसेल तर ओबीसी शांत बसणार नाही. ओबीसीची जनगणना करावी. जय भगवान महासंघ व ओबीसी जन मोर्च्याचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनीही राज्यभर आंदोलन करून ओबीसीच्या लढ्याला बळ दिले आहे.
दरम्यान, जय भगवान महासंघ पुणे जिल्हा, मराठवाडा जनविकास महासंघ महाराष्ट्र राज्य, ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर, बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य, प्रहार संघटना इत्यादी संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठींबा दिला.