तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब यांना शिवसैनिकांकडून अभिवादन

तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब यांना शिवसैनिकांकडून अभिवादन

पिंपरी : तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्याची सावली माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. आकुर्डीतील सेनाभवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी शहर संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, पुणे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, महिला आघाडीच्या शहर संघटीका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनिता तुतारे, कल्पना शेटे, उपशहर प्रमुख हरेश नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, वैशाली कुलथे, शारदा वाघमोडे, रजनी वाघ, रुपाली आल्हाट, कामिनी मिश्रा, वैशाली काटकर, उषा आल्हाट, भाग्यश्री म्हस्के, कोमल जाधव, रोहिणी कोबल, योगिनी वाडकर, हर्षाली घरटे आदी मान्यवर उपस्थित होते.

तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब यांना शिवसैनिकांकडून अभिवादन

त्यावेळी वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, “हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कामाची शिकवण दिली, त्याप्रमाणे काम करून तसेच माँसाहेब यांनी जस सगळ्यांना सांभाळून घेतलं. त्याचप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, आणि सगळ्यांनी एकदिलाने एकमताने आजपर्यंत काम केले आहोत, तसेच पुढेही करत राहू.”

माई यांच्या जयंतीनिमित्त महिलांना संबोधीत करताना शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटीका उर्मिला काळभोर म्हणाल्या की,” माँसाहेब यांनी शिवसैनिकांना मायेची सावली दिली. त्याप्रमाणेच आपण महिला आघाडी एकमेकींना सांभाळून घेऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाऊ आणि हिंदू ह्रदयसम्राट व माँसाहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करू.”

माँसाहेब यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे म्हणाल्या की,” संपुर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक मातोश्रीवर किंवा काही कामानिमित्त मुंबईत येत असे, त्यावेळी कधी कोणी उपाशी असेल तर माँसाहेब त्यांना जेऊ घालायच्या. त्यांची मायेने विचारपूस करायच्या. घरी परतण्यास पैसे नसतील तर त्यांना अडीअडचणीत मदत करायच्या. अशा प्रकारे शिवसैनिकांना त्यांचा मोठा आधार असायचा. त्यामुळेच त्यांना सर्व जण मायेची सावली म्हणायचे.”