
मुंबई : मातंग समाजातील पहिली महिला आयपीएस अधिकारी भावना यादव यांचा एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना व शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यादव यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदी नियुक्ती झाली आहे. २८ वर्षीय भावना या देशात मुलींमध्ये पहिल्या आल्या असून त्या महाराष्ट्रातील एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहेत.
मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, आरपीआय कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार कांबळे, महादेव गालफाडे, मातंग एकता दलाचे श्रीकांत शिंदे, मातंग समाजाचे नेते अशोक सरोदे, सुखदेव होळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
- Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे
