पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम पीसीएमसीचा पदग्रहण समारंभ सांगवी येथील निळू फुले सभागृह येथे मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाला. अध्यक्षपदी प्रसन्ना राठी व पुढील वर्षासाठी विकास राठी यांची निवड करण्यात आली, तसेच मागील वर्षाचे अध्यक्ष सीए मनोज मालपाणी यांनी मागील वर्षात झालेल्या कार्यक्रमाचे विश्लेषण केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा टावरी व डॉ. संदीप बाहेती यांनी केले. या कार्यक्रमात अन्य संचालकांनी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी, पालकांच्या आशिर्वादासह, पदभार देखील सांभाळला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय मालपाणी (संचालक मालपाणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) उपस्थित होते.
त्यांनी मार्गदर्शन पर उपदेश देताना श्रीमद्भगवद्गीतेचे आयुष्यातील प्रॅक्टिकल महत्त्व समजून सांगितले व यशाचे सूत्र येणाऱ्या नव्या संचालक मंडळाला समजून सांगितले. या कार्यक्रमास MFCTची गार्डियन ट्रस्टी P. G. Mundada व अनेक माहेश्वरी समाजातील मान्यवरांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.