पिंपळे सौदागर येथील क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनची चमकदार कामगिरी

पिंपळे सौदागर येथील क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनची चमकदार कामगिरी
  • उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसेंकडून संघाचे कौतुक

पिंपरी : डे-नाईट क्रिकेट स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात महिलांच्या राधाईनगरी क्रिकेट संघाने अजिंक्यपद तर, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनने विरोधी संघावर विजय मिळवीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यशाबद्दल संघाचे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी कौतुक केले.

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे हाफ पीच टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेस सौदागरमधील क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बाप्पू काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय आबा भिसे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, चंदा भिसे, विकास काटे, भुषण काटे, शशी काटे, रमेश काटे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथील क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनची चमकदार कामगिरी

Actions

Selected media actions