चिंचवडगावात भीम जयंती उत्साहात साजरी

चिंचवडगावात भीम जयंती उत्साहात साजरी

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चिंचवडगाव महोत्सवामध्ये १३ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध चौक येथे आतीशबाजी करण्यात आली. १४ एप्रिलला सकाळी पंचशील झेंडा फडकविण्यात आल्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.

तसेत १७ एप्रिलला भिम गितांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चिंचवडगाव येथील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व प्रबुद्ध संघाचे बहुतांश सभासद उपस्थित होते. कार्यक्रमात प्रस्तावना किशन बलखंडे (सचिव प्रबुद्ध संघ) यांनी केली, तर मार्गदर्शन अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केले. भिम महोत्सवात भिम गितांचा बहारदार कार्यक्रमात प्रबोधनपर गाणी झाली. कार्यक्रम झाल्यानंतर प्रबुद्ध संघाच्या वतीने भोजन देण्यात आले.

Actions

Selected media actions