‘को वाडीस?’ व्हॅटिकन सिटी आणि सेंट पिटर्स स्केअरकडे !
कामिल पारखे
बायबलमध्ये एक कथा आहे. येशू ख्रिस्त आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जातो आहे आणि त्यावेळेस आपल्या होणाऱ्या छळापासून सुटका घेण्यासाठी रोममधून पळ काढणाऱ्या सेंट पिटरची त्याची गाठ पडते. रोमकडे निघालेल्या आपल्या प्रभूला पाहून पिटर थक्क होतो. ''दोमिनी, को वाडीस ?'' 'प्रभूं, तू कुठे चाललास ? असे तो विचारतो. ''मी पुन्हा एकदा क्रुसावर मरायला निघालो आहे!'' येशू आपल्या सर्वात लाडक्या शिष्याला सांगतो आणि सेंट पिटरला आपली चूक समजते. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांची रोममध्ये होणाऱ्या छळाची पर्वा न करता तो माघारी वळतो आणि रोमन साम्राज्याच्या या राजधानीत तो हौतात्म्य कवटाळतो.
लॅटिन भाषेतील 'को वाडीस' (कुठे निघालास?) हा वाक्प्रचार त्यातील गर्भित आशयामुळे अनेक भाषांत रुढ झाला आहे. (बायबलमधील जुना&nb...