पिंपरी : बहुजन समाजाच्या प्रामुख्याने मातंग समाजाच्या प्रगतीकडे व प्रश्नांकडे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कानाडोळा तर करित नाहीत ना? अशी शंका शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा अखंड बाराबलुतेदार समाज बांधव महासंघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत दाखले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये भाजपा-शिवसेना सरकार गेल्यानंतर नव्याने शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस तसेच इतर राजकिय पक्ष व अपक्ष आमदारांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे.
मात्र, या सरकारच्या काळामध्ये बहुजन व अखंड बाराबलुतेदार समाज बांधवानवर प्रामुख्याने मातंग समाजावर अन्याय होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्यातील आमदार व खासदार यांनी शिफारस पत्रे व विनंती करून देखील मुख्यमंत्री साहेब आपण शब्द देखील काढला नाही हे कितपत योग्य आहे.
तर मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी कोणतेही ठोस पावले आपण उचलत नाहीत हा समाजावर आन्याय नाही का?
त्याचबरोबर मातंगवीर संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाला १३% आरक्षणामधुन लोकसंख्येच्या तुलनेत अ ब क ड वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी जलसमाधी घेतली. अद्याप त्या कुटूंबाला न्याय का देता आलेला नाही, हा मातंग समाजावर अन्याय नाही का? आदी मुद्यांकडे दाखले यांनी लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री साहेब आपण स्व:ताहा गांभीर्याने दखल घेऊन मातंग समाजाच्या प्रगतीकडे लक्ष, न्याय द्याल. हीच आपेक्षा. असे निवेदनात नमूद केले आहे.