शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन

शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन

लोकमराठी : शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व भाग्यश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत मोफत शारीरिक तपासणी व व्यायामवय वर्ष 50 पुढील नागरिकांना सतावणारे, मानदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे, टोल जाणे, इत्यादि शारीरिक व्याधीवर वेग वेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेण्यात येतील.

सोमवारी या शिबिराचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, भाग्यश्री चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. स्वाती भिसे, ज्येष्ठ नागरिक संघांचे खजिनदार प्रकाश शिंदे, स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोंडकर, अंजली देव, अक्षदा देशपांडे, गाडे मावशी, पवार बाबा, श्रारण अवसेकर, इत्यादी उपस्थित होते. सारिका रिकामे यांनी सूत्रसंचालन केले.

शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन