मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !

मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !

महेंद्र अशोक पंडागळे

मागच्या वेळी केरळमध्ये आलेल्या पुराला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने (देवेंद्र फडणवीस यांनी ) 200 कोटी रुपये दिले होते, असे म्हणतात माहीत नाही. पण तेंव्हापासूनच या निधी कक्षाला काय झालंय काही कळत नाहीये. गेली वर्षभरात कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगाचे रुग्ण ज्या स्पीडने वाढत आहेत, तरुण लहान मुले पटापट मृत्युमुखी पडत असताना राज्याच्या खात्यातून आणि इतर कोणत्याही ट्रस्टकडून हवी तशी काहीही मदत मिळताना दिसत नाहीये. इतकंच काय तर Tata Trust सारखी इतकी मोठी ट्रस्ट सुद्धा कमी पडायला लागली आहे, अशी भयानक परिस्थितीत आज महाराष्ट्र राज्य आहे.

नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने 2014 ला सत्तेत आल्यापासून सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणाऱ्या Ngo आणि Trust यांचा FCRA बंद करून बाहेरून येणारी हजारो कोटींची मदत रोखून धरली आणि त्यामुळेच राज्यात 12AA, 80G आणि FCRA असलेल्या हजारो सामाजिक संस्था आज जागेवर बसून आहेत.

याउलट राज्यातले जे भक्त आणि भाविक आहेत, जे गणपती आणि साईबाबा यांना भक्ती भावाने पूजतात आणि सिद्धिविनायक मंदिर, लालबागच्या राज्याला, हाजीअली दर्गा, गुरुद्वारे, महालक्ष्मी मंदिर, तसेच शिर्डी संस्थानांत जातात तिथे केवळ पाया पडून घरी येत नाहीत तिथे सोने, नाणे, हिरे, दागिने आणि पैसे दान करून येतात आणि हीच संस्थाने गरजेच्या वेळी हिंदू, मुस्लिम समाजातील गरीब रुग्णांच्या मदतीला येत नाहीत हे सत्य किती दिवस लपवून ठेवल पाहिजे असा प्रश्न निर्माण होतोय?

याच संस्थानातील अध्यक्ष, सचिव, ट्रस्टी रुग्णांच्या नातेवाईकांना कश्या प्रकारची वागणूक देतात याची प्रचिती हजारो लोकांना आजवर आली आहे, इतकंच काय तर शिर्डीच्या साईबाबांच्या नावाने भक्ती करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या भक्तांना मी इथे सांगू इच्छितो की,
साईबाबा ट्रस्ट एकाही ट्रस्ट, खाजगी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या कोणत्याच रूग्णांना कवडीचीही मदत करत नाही, इतकंच काय तर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या लोकांना केवळ 2 ते 5 हजार रुपड्यांची मदत करते.

अश्या माजोरड्या ट्रस्टच्या लोकांना तुमचा देव शिक्षा का करत नसावा बरं ? हीच परिस्थिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट ची आहे.
शिवसेनेचे लाडके आदेश भावजी इथे अध्यक्ष आहेत. पण हे भावोजी एकाही वहिनीला किंवा ताईला 25 हजार रुपयांच्या वर मदत करत नाहीत (ते ही दुनियाभरचे कागदपत्र आणि नसत्या चौकश्या). हाजीअली आणि महालक्ष्मी मंदिराची परिस्थिती याहून वेगळी नाहीच.

त्यातल्या त्यात टाटा ट्रस्ट लोकांना मदत करते, पण त्यात ही अतिशय किचकट पद्धतीने, चौकशीचा ससेमिरा, पोलीस स्टेशन Type investigation, varification या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर, हृदरोग, किडनी आणि इतर आजाराने त्रस्त असलेला लोकांना या ट्रस्ट छळत आहेत.

आरोग्यव्यवस्थेवर उपाय म्हणून काँग्रेस सरकारने 2009 ला नागपुरच्या कस्तुचंद पार्क मध्ये राजीव गांधी यांच्या नावाने “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना” आणली होती, त्यात 972 आजार बरे करण्यासाठी 3 लाखांपर्यंत पैश्याची व्यवस्था केली होती. फडणविस सरकार आल्यापासून त्यांनी राजीव गांधींच्या नवाऐवजी “महात्मा फुले” यांच्या नावाने हीच योजना पुढे सुरू ठेवली.

नेमकं झालं असं की, कॅन्सर, हृदयरोग आणि किडनी या आजारांसाठी आज ही योजना बिनकामाची आहे, यात केमोथेरपी किंवा अँजिओप्लास्टी सुद्धा होत नाही, आधी यात अंजिओग्राफी आणि प्लास्टी (2 स्टेंट) करून मिळायचे त्यावर 60,000 रुपये रुग्णाला द्यावे लागायचे आज परिस्थिती अशी आहे की, अंजिओग्राफी फुकट नाही पण प्लास्टी 2 स्टेंट पर्यंत करून मिळते, हीच परिस्थिती कॅन्सर बद्दल आहे, केमोथेरपी केली की रेडिएशन करून मिळत नाही, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप सारी गुंतागुंत आहे, किडनी ट्रान्सप्लांट ची परिस्थिती तर अजूनच भीषण आहे. वर ज्या रुग्णांनी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलाय त्याना मुख्यमंत्री सहायता निधी कडून काहीही मदत मिळत नाही.

या नेमक्या कोंडीमुळे झालय अस की, पेशंट आणि नातेवाईक अश्या विचारात असतात की, पुढचं पुढं बघू आधी थोडी तरी ट्रिटमेंट करून घेऊयात आणि लोक नेमके इथे फसतात ट्रीटमेंट होते पण पुढे मग काही केल्या गोष्टी सरकत नाहीत. आणि रुग्ण हळू हळू मरनाकडे मात्र सरकतो. आणि नातेवाईक रडत मजबुरीने रुग्णाच्या मरणाची अप्रत्यक्ष पणे वाट बघत बसतात
कारण, हा मेला की किमान ह्याच्यावर होणारा खर्च आमच्या पोराबाळांच्या शिक्षणावर, खाण्यापिण्यावर करता येईल, घरभाडे देता येईल वैगेरे वगैरे.

कविवर्य आणि जेष्ठ साहित्यीक दिवंगत बाबुराव बागुल यांनी फार वर्षांपूर्वी “मरण स्वस्त होत आहे” अशी कथा लिहिली होती आज मी आबांची माफी मागून अस म्हणेल की, “मरण महाग होत आहे”.

आज मुख्यमंत्री निधी असेल किंवा धार्मिक ट्रस्ट असतील किंवा इतर ट्रस्ट असतील आज कोणीही सलग कोणालाच मदत करताना दिसत नाहीये, या सगळ्या ट्रस्ट वर नियंत्रण असलेले धर्मादाय आयुक्त आणि त्यांची गॅंग आज काहीही Co-ordination करताना दिसत नाहीये पण अशाही परिस्थितीत गुजराती रुग्णांना, काठेवाडी रुग्णांना, जैनांना, राजस्थानी लोकांना त्यांच्या ट्रस्टकडून भरभरून मदत केली जातेय याची आठवण स्वतःला मराठी, मराठा, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख समजणाऱ्या बांधवांनी ठेवावी इतकंच.

गेल्या कित्येक वर्षांपासून एक मेसेज व्हाट्सअप्प वर फिरतो तो असा की, मुख्यमंत्री निधी मधले ओमप्रकाश शेट्टे आणि सलमान खान यांच्या वतीने लहान मुले आणि इतर रुग्णांना मदत केली जाईल असे भंकस, खोटारडे आणि फालतू मेसेज पाठवणाऱ्या डिजिटल अंगुठा बहाद्दरानो, खुनाच्या केसमध्ये बरी झालेला सलमान मुंबई बाहेरच्या एकही व्यक्तीला मदत करत नाही, जोवर त्याला एखादी स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटेल त्यात climax असेल अश्याच केसेसला तो मदत करतो. त्यामुळे सलमानला उरावर घेऊन नाचणाऱ्या भक्त औलादिनो अजून थेटर मध्ये जाऊन त्याचे सिनेमे बघा जरा म्हणजे लहान मुलांना अजून मदत मिळेल.

मुख्यमंत्री निधीतून आज कधी नव्हे अशी 10 हजार, 25 हजार अशी तुटपुंजी रक्कम 5 ते 10 ते 35 लाखांपर्यंत cost estimate असलेल्या रुग्णांना दिली जाते यावर त्या रुग्णांनी कराव तरी काय ? (आता गेल्या 7 महिन्यापासून काहीही मिळत नाहीये) आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदार यांच्यावर खैरात वाटली जात आहे, जमिनी, पाणी, वीजबिल सगळं सगळं माफ केले जातंय आणि सामान्यांना केळं दिल जातंय.

ज्या टाटा, बिर्ला, अंबानी, मित्तल, गोदरेज यांना हजारो एकर जमीन फुकट दिल्या, त्यांच्याच मेडीकल ट्रस्ट ह्या आज जनतेला ठेंगा दाखवत आहेत. CSR च्या नावाखाली 2% खर्च करायचा म्हणून ह्याच भांडवलदारी आणि नेहरू प्रणित कारखानदारांनी देशाला लक्ख लुटून खाल्यय आणि 2 टक्क्यांचा डकार पण ह्यांना आपल्याच संस्थेत द्यायचा आहे.

आणि ही भयानक कोंडी फोडायची कशी या विचारात असताना याहून भयंकर गोष्ट ही आहे की, राज्यात विरोधी पक्ष शिल्लकच राहिला नाहीये, RTI वाले मांडवली बहाद्दर मूग गिळून गप्प आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांना हा आरोग्याचा प्रश्नच कळला नाहीये आणि त्याहूनही होशियार असलेले माझ्यासारखे आणि माझ्याकसकट सगळे MSW जे कित्येक वर्षांपासून वैधकीय क्षेत्रात काम करत आहेत ते ही यावर मूग गिळून गप्प का आहेत ?

2014 च्या नंतर रोजगाराचा प्रश्न आणखी भीषण झालेला असताना, राज्यात दुष्काळ असताना, नोटबंदीमध्ये नोकऱ्या गमावलेल्या अवस्थेत असताना, आणि आता कोरोनासारखी महाभयंकर महामारी आली असताना, घरातल्या कमावत्या माणसावर किंवा त्याच्या तान्ह्या बाळावर एकाएकी कॅन्सरने झडप घालावी आणि त्याच्या कुटुंबाचं जमीन, पाणी, शेती, घर आणि पैसा त्याच्यासकट कॅन्सर ने घशात घालावा आणि आपण त्यांच्या मयताचे खान्देकरी व्हावं यासाठीच हा लेख लिहिलाय कृपया प्रत्येक समाजातील खान्देकरी बनणाऱ्यानी पुढे पाठवावा ही विनंती.

टीप :
कोरोना असला तरी कॅन्सर आणि इतर जीवघेण्या आजारांच्या पेशंटला मदत केलीच पाहिजे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष वेगळ्या पद्धतीने सुरू व्हायलाच पाहिजे, राज्यातील सगळ्यांच वैधकीय NGO नी हे लावून धरलं पाहिजे, ही पोस्ट जास्तीत जास्त Share करा भले स्वतःच्या नावाने Share करा पण share करा.

महेंद्र अशोक पंडागळे
MSW,
INSPIRE Foundation,
07678044677