अभिनेते सयाजी शिंदे यांची बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद

अभिनेते सयाजी शिंदे यांची बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद

पुणे (लोकमराठी) : अभिनेते व निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांची बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद घालत, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुरस्कृत व आई निर्मिती संस्था आयोजित ‘निसर्ग संवर्धन काळाची गरज’ या विषयांतर्गत व्हिडिओ स्वरूपात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही वक्तृत्व स्पर्धा १५ वर्षा खालील बालमित्रांसाठी (मुले/मुली) आहे. त्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडीओ असणे गरजेचे आहे. “निसर्ग आपला नातेवाईक आहे. आणि त्याला सोडून आपण जे काही करत आहोत, त्याचेच परिणाम आपण कोरोना जन्य परीस्थिती तुन भोगत आहोत. तर बालमित्रांनो निसर्ग संवर्धनासाठी, निसर्ग आपला नातेवाईक मानुन स्पर्धेसाठी आपल्या कलाकृती पाठवा” असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.

कवीता, नाटक, गीत, निबंध, विनोद यापैकी कोणत्याही एका प्रकारात आपल्या कलाकृती 9226789883 या नंबरवर व्हॉट्स ॲपद्वारे किंवा aainirmiteesanstha@gmail.com या ठिकाणी मेल द्वारे 20 एप्रिलपर्यंत पाठवायचे आहे. भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश, अटी व नियमांसाठी वरील दिलेल्या नंबरवर किंवा मेल आयडीवर चौकशी करा. असे आव्हान आयोजकांनी केले आहे.