बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण
पिंपरी चिंचवड : कोरोना संदर्भातील नियम अनेक नागरिकांकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून आज शहरात २२७५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तसेच आज १२८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, एक लाख ३४ हजार ५४१ एकूण करोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख १६ हजार १७७ रूग्ण कोरोना मुक्त झालेत. शहरातील २८०३ जणांना मृत्यू झाला आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार आज आढळलेली रूग्ण संख्या खालीलप्रमाणे.
अ प्रभाग (३१८ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
10, 14, 15, 19
शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, आकुर्डी, गंगानगर, वाहतूकनगरी, उद्योगनगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प
ब प्रभाग (३६० बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
16, 17, 18, 22
वाल्हेकरवाडी, दळ...