काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

काळेवाडी : वाढती बेरोजगारी व कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या अनुषंगाने युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्या वतीने काळेवाडीत भव्य नोकरी महोत्सवाचे गुरूवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रभागातील सुमारे १८०० जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये १०१ जणांना थेट नोकरी मिळाली आहे. डॉ. माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची जनसेवा सुरू आहे.

अनेक जण सुशिक्षित असूनही नोकरी लागत नाहीत. ते सतत नोकरीच्या शोधात असतात. नोकरी नसल्यामुळे कुटुंब चिंतेत असते. ही बाब लक्षात घेत तसेच ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. अक्षय माने यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर हा नोकरी महोत्सव आयोजित केला होता.

या महोत्सवात उत्पादन, वाणिज्य व वित्तीय संस्था, बीपीओ, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा प्रशिक्षण, वाहननिर्मिती व बांधकाम क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पहीली ते दहावीपर्यंत, बारावी ते पदवीधार, आयटीआय, डिप्लोमा तसेच अंतिम वर्ष पदवी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेत १०१ उमेदवारांना थेट नोकरी दिली.

काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

याबाबत डॉ. अक्षय माने म्हणाले की, “काळेवाडी, प्रभाग क्रमांक २२ मधील सुशिक्षित बेरोजगार व कोरोना काळात नोकरी गमावलेल्या तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा १८०० लोकांनी लाभ घेतला. त्यातील १०१ उमेदवारांना थेट नोकरी मिळाली. या महोत्सवाचा बेरोजगार तरूणांना फायदा झाल्याने माझा उद्देश सार्थकी लागला. याचे मोठे समाधान मिळाले.”