लोकमराठी न्यूज नेटवर्क
काळेवाडी : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका बालकांना असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रॉयल फाउंडेशनच्या प्रयत्नातून रविभाऊ नांगरे यांच्या वतीने आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम येथे शालेय साहित्य, मास्क तसेच अन्नधान्य, खाऊ व हाऊसकिपींग किटचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रविभाऊ नांगरे यांनी मुलांना कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियमांची माहिती दिली, तसेच करिअरबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
रविभाऊ नांगरे म्हणाले की, “पाच ते दहा या वयोगटातील मुलं कोणतीही कला चांगल्या प्रकारे व लवकर शिकू शकतात. त्यामुळे रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून बालग्राममधील मुलांना संगिताचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी दोन ते तीन सेमिनार आयोजित करणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना संगित क्षेत्रात रुची निर्माण होईल व ही कला आत्मसात केल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.